वृत्तसंस्था/ सेंट लुईस
येथे सुरू होणाऱ्या 4 लाख 12 हजार अमेरिकन डॉलर्सच्या क्लच चेस चॅम्पियन्सच्या लढतीत जागतिक विजेत्या डी. गुकेशला आतापर्यंतच्या सर्वात कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल. युरोपियन क्लब कपमध्ये सुपर चेस संघाला शानदार विजय मिळवून दिल्यानंतर युरोपमधून दुसरा खंड धावाधाव करून गाठलेला गुकेश सेंट लुईस बुद्धिबळ क्लब येथे नव्याने आखणी केलेल्या सुविधेत रॅपिड बुद्धिबळ स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या 18 सामन्यांमध्ये जगातील अव्वल तीन क्रमांकाच्या खेळाडूंचा सामना करेल.
2011 पासून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने अलीकडेच वडील बनल्याने घेतलेला ब्रेक आता संपला असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला हा खेळाडू पुन्हा एकदा हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो काऊआना या अमेरिकन जोडीच्या पुढे जेतेपदाचा सर्वांत भक्कम दावेदार म्हणून सुऊवात करेल. पंधरा दिवसांतील क्लच चेसच्या या दुसऱ्या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस निधीतील सिंहाचा वाटा म्हणजे 1 लाख 20 हजार डॉलर्स मिळतील. उपविजेत्यासाठी बक्षीस 90000 डॉलर्स आहे, तर तिसरे आणि चौथे बक्षीस अनुक्रमे 70000 डॉलर्स आणि 60000 डॉलर्स आहे. प्रत्येक फेरीत मिळविलेल्या प्रत्येक विजयासाठी अतिरिक्त 72000 डॉलर्स देखील मिळणार आहेत. बरोबरी झाल्यास बक्षीस रक्कम एकंदरित विजेत्याच्या खात्यात जोडली जाईल.
ग्रँडमास्टर मॉरिस अॅश्ले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या क्लच बुद्धिबळात दररोज चुरस वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण पहिल्या दिवशी मिळालेला कोणताही विजय एक गुण देऊन जाईल, तर दुसऱ्या दिवशी दोन गुण मिळतील आणि शेवटच्या दिवशी नोंदणीकृत प्रत्येक विजयासाठी तीन गुण मिळतील. त्याचप्रमाणे खेळांसाठी राखीव बक्षीस निधी देखील दररोज वाढेल. या महिन्याच्या सुऊवातीला खेळल्या गेलेल्या पहिल्या स्पर्धेत 30 वर्षांनंतर आपल्यामधील स्पर्धेचे पुनरुजीवन केलेल्या दोन दिग्गजांमध्ये चेस 960 प्रकारातील सामना रंगला होता.
त्यात पुन्हा एकदा गॅरी कास्पारोव्हने दोन गेम शिल्लक असताना सामना जिंकून आनंदपेक्षा आपण बलवान असल्याचे सिद्ध केले होते. गेल्या एका आठवड्यात गुकेशने तीन विजय मिळवले आहेत. युरोपियन वैयक्तिक स्पर्धेतील त्याच्या पाच सामन्यांमध्ये दोन अनिर्णित राहिले. सर्वांत जास्त कौतुकास्पद सामना देशबांधव अर्जुन एरिगेसीविरुद्धचा राहिला, ज्याने सामना अनिर्णीत ठेवण्याच्या संधी गमावल्या.
काऊआना देखील बराच व्यस्त राहिलेला आहे, कारण त्याने नुकतेच त्याचे सलग चौथे आणि पाचवे यूएस चॅम्पियनशिप जेतेपद मिळविलेले आहे, तर नाकामुरा पुढील कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने रेटेड गेम्सची संख्या पूर्ण करण्यासाठी फिडेने दिलेली अंतिम मुदत पाळण्याचा प्रयत्न करत आहे. कार्लसन अलीकडे फारसा खेळलेला नाही. परंतु इतिहासाने दाखवून दिलेले आहे की, जेव्हा खेळाच्या वेगवान आवृत्त्यांचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्या कामगिरीशी कुणाची बरोबरी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवशी सहा सामने होतील आणि एकूण 36 गुण पणाला लागतील.









