वृत्तसंस्था/ हॅम्बर्ग (जर्मनी)
फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यात विश्वविजेता डी. गुकेशने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी चुरशीच्या सामन्यानंतर बरोबरी साधली. अमेरिकन फॅबियानो काऊआनाविऊद्ध उपांत्य फेरीत 0-2 असा पराभव पत्करल्यानंतर गुकेश या प्रकारच्या बुद्धिबळातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाकामुराविऊद्ध पुन्हा आत्मविश्वासाने परतला. महत्त्वाचे म्हणजे या ग्रँड स्लॅम टूरचा मुख्य नायक मॅग्नस कार्लसन या दिवशी तऊण व्हिन्सेंट कीमरकडून पराभूत झाला, तर काऊआनाला उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हविरुद्ध खेळताना बरोबरीवर समाधान मानावे लागले.
दिवसाच्या अन्य सामन्यात उझबेकिस्तानच्या अब्दुसत्तोरोव्हने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला. गुकेशला पराभवातून बाहेर येण्याची आवश्यकता होती आणि त्याने ते साध्य करताना खेळाच्या शेवटपर्यंत नाकामुराला तोडीस तोड उत्तर दिले. अमेरिकन खेळाडूने सुऊवातीपासूनच आक्रमक खेळ केला तथापि, गुकेशला लवकरच तुल्यबळ राहण्याचा मार्ग सहज सापडला आणि सामना अनिर्णीत राहिला. कुठल्याही स्थितीत बरोबरी नाही अशा दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुकेशची ही स्पर्धेतील आठवी बरोबरी आहे. यापैकी पहिल्या सात बरोबरी या नऊ फेऱ्यांच्या प्राथमिक टप्प्यात नोंदल्या गेल्या.
दिवसाचा सर्वांत महत्त्वाचा धक्का कीमरने दिला, ज्याने त्याचा सर्वोत्तम खेळ सादर केला. कीमर आणि कार्लसन हे सुऊवातीपासूनच सामान्य दिसणारी स्थिती निर्माण करण्यात यशस्वी झाले, पण शेवटी जर्मन खेळाडूने परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली. त्याने बुद्धिबळप्रेमी चकीत झाल्याशिवाय राहिले नाहीत. कीमरने त्याच्या संसाधनांचा चांगला वापर केला आणि आता तो अंतिम फेरीत स्थान मिळविण्यापासून फक्त एक बरोबरी इतका दूर आहे.









