दिप्तयनचा नेपोम्नियाचीला धक्का
वृत्तसंस्था/ पणजी
ग्रँडमास्टर दिप्तयन घोषने बुधवारी दुसऱ्या फेरीतील दुसरा गेम जिंकून जागतिक स्पर्धेतील माजी आव्हानवीर रशियाच्या लान नेपोम्नियाचीचा पराभव केला आणि बुद्धिबळ विश्वचषकातील सर्वांत मोठ्या धक्क्याची नोंद केली.
एकतर्फी खेळात घोषने नेपोम्नियाचीला कोणतीही संधी दिली नाही, जो पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळतानाड खूपच अनियमित दिसला. सुऊवातीमुळे घोषचे स्थान अस्पष्ट होते आणि नेपोम्नियाचीने मधल्या खेळात सुऊवातीलाच एक साधी चाल चुकवली, ज्यामुळे त्याला मोहरा गमवावा लागला. तांत्रिक बाबी महत्त्वाच्या बनल्यानंतर घोषने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि तो दबाव वाढवत राहिला. त्यानंतर लवकरच ही लढत संपुष्टात आली. माझ्या बुद्धिबळ कारकिर्दीतील हा निश्चितच सर्वांत मोठा विजय आहे, असे घोषने विजयानंतर सांगितले.
तत्पूर्वी, ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण हा रशियाच्याच आर्सेनी नेस्टेरोव्हला हरवून तिसऱ्या फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला, तर जागतिक कनिष्ठ विजेता व्ही. प्रणवला नॉर्वेच्या आर्यन तारीविऊद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना मिळविलेल्या विजयामुळे प्रणवचे पारडे खरे तर जड होते. पण त्याने संधी वाया घालविली. यामुळे दोघेही आता पुढील मार्ग निश्चित करण्यासाठी टायब्रेकर गेम खेळतील.
दुसरीकडे, जागतिक विजेता डी. गुकेश आणि भारताचा अव्वल खेळाडू अर्जुन एरिगेसी विश्वचषकाच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले आहेत, तर आर. प्रज्ञानंद, एस. एल. नारायणन आणि निहाल सरिन यांना पुढे जाण्यासाठी आज गुऊवारी त्यांचे संबंधित टायब्रेकर जिंकावे लागतील. गुकेशने कझाकच्या काझीबेक नोगरबेकला दुसऱ्या गेममध्ये पराभूत करून सामना 1.5-0.5 असा जिंकला. एरिगेसीने बल्गेरियन मार्टिन पेट्रोव्हविऊद्धचा दुसरा सामनाही जिंकून प्रगती केली. परंतु उझबेकिस्तानी-ऑस्ट्रेलियन ग्रँडमास्टर तेमूर कुयबोकारोव्ह हा प्रज्ञानंदसाठी प्रबळ प्रतिस्पर्धी ठरला. त्याने भारतीय सुपरस्टारला सलग दुसऱ्यांदा बरोबरीत रोखले.









