ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रासह देशभरात लाऊडस्पीकरवरवरून वादंग सुरु आहे. तर उत्तर प्रदेशात योगी सरकारने सर्व लाऊडस्पीकरवर उतरविण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत लाखो लाऊडस्पीकर खाली उतरवले आहेत. आत गुजरातमध्येही लाऊडस्पीकरचा वाद समोर आला आहे. लाऊडस्पीकरवर आरती केल्यानंतर एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जसवंतजी ठाकोर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात हीघटन घडली आहे.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लाऊडस्पीकरवर आरती केल्यानं व्यक्तीची हत्या केली आहे. एका गावात मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती वाजवल्याच्या कारणाने त्याच्याच समुदायाकडून व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लाऊडस्पीकरवरून दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.
मेहसाणातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाऊडस्पीकरवर आरती केल्यानं जसवंतजी ठाकोर याला त्याच्याच समुदायाकडून मारहाण झाली. या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. तर रोजंदारीवर काम करमाऱ्या जसवंतजी यांच्या मोठ्या भावाचा जबाब नोंदवण्यात आला. याप्रकऱणी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसवंतजी यांचे भाऊ अजित यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं त्यांनी पोलिसात तक्रार देताना सांगितले.