अर्चना बनगे,प्रतिनिधी
Gujrat Assembly Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजपने (BJP) आतापर्यंत 154 जागांवर विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये भाजप कार्यंकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. मागील निवडणुकीत भाजपला कच्छ सौराष्ट्रमध्ये पिछाडी घ्यावी लागली होती.मात्र यावेळी कच्छ सौराष्ट्रमध्ये भाजपला यश मिळाले आहे. गुजरातचा शहरी भाग, ग्रामीण भाग, प्रादेशिक भागात भाजपने दमदार यश मिळवल आहे.
गुजरातमध्ये (Gujrat) भाजपच्या यशासाठी आप हा फॅक्टर महत्वाचा होता. 2017 च्या तुलनेत आपला 0.1 टक्के , भाजपला 49 तर कॉंग्रेसला 44 टक्के मतदान मिळालं होतं. 27 वर्षांनंतर देखील 182 पैकी 154 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. य़ामध्ये दोन महानायकांचं मोठं काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Amit shaha) यांनी यश संपादन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
या निवडणुकीसाठी अमित शहा यांनी 135 रॅली काढल्या होत्या. तर नरेंद्र मोदी यांनी 30 रॅली काढल्या. भाजपने निवडणूक लढवण्यासाठी याआधी सोशल मीडिया ही स्टॅटेजी वापरली होती. यावेळी सोशल मीडियासोबत अमित शहा गुजरातमध्ये ठाण मांडून होते.काॅंग्रेस ग्रासरूटवर काम करतेय म्हणून आपणही ग्रासरूटवर काम केलं पाहिजे असा विचार करून जो उमेदवार निवडला गेला त्याची लोकांशी असलेली कनेक्टेव्हिटी पाहिली गेली होती. प्रत्येक उमेदवारांवर काम केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्याच बरोबर केंद्रामध्ये तरुणांना संधी देण्यात आली होती. याचाही फायदा गुजरातला झाला आहे. यासोबतच सी. आर. पाटील यांना भाजपने जबाबदारी दिली होती. त्याच फायदा आता महाराष्ट्रात भाजपचा भक्कम पाय रोवण्यात होणार आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- भाजपा-काँग्रेसमध्ये रस्सीखेच, हिमाचलमध्ये भाजपन खातं उघडल
महाराष्ट्राशी गुजरातचं कनेक्शन
गुजरातमध्ये भाजपच्या विजयाने महाराष्ट्रातील निवडणुकीची वाट मोकळी झाली आहे. महाराष्ट्रात अनेक लोक गुजरातमधील आहेत. येत्या मुंबई निवडणुकीत याचा भाजपला नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









