अर्चना बनगे,प्रतिनिधी
Gujrat Assembly Election Results 2022 : गुजरातमध्ये ‘अब की बार 150 पार’ असा नारा सिध्द झाला आहे. 56 टक्के मतांसह भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले .मात्र कॉंग्रेसची (Congress) गुजरातमध्ये दाणादाण झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेस गुजरातमध्ये आपला झेंडा रोवेल असा अनेकांनी अंदाज बांधला होता. मात्र भाजपने 157 जागांवर आघाडी केली तर कॉंग्रेसला 16 जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचा तळागाळा पर्यंत पोहचण्याचा फंडा भाजपने (BJP) उचलला आणि यश संपादन केलं.याउलट कॉंग्रेसची उडालेली दाणादाण ही मत विभाजनाचा फटका बसल्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे.तर भाजप विरोधी एक विचार असलेल्या पक्षाने एकत्रित यायला हवं आणि पुढं जायला हवयं असा संदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनी दिला. नेमकी गुजरातमध्ये (Gujrat)काय चर्चा सुरु आहे. कॉंग्रेस मागे का पडली याची प्राथमिक कारणे जाणून घेऊया.
गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची दाणादाण उडाली. 179 जागांवर उमेदवार देऊनही कॉंग्रेस जेमतेम 16 जागी आघाडीवर आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मत विभाजनाचा फटका असल्याचा विश्लेषकांनी अंदाज बांधला आहे. दुसरे म्हणजे कॉंग्रेसला मुख्य अस एक नेतृत्व नाही.ज्याच्या आधारावर किंवा मार्गदर्शनावर इतर उमेदवार निवडणुक लढवतील. गेल्या पाच वर्षात कॉंग्रेसला काम करण्याची संधी होती. पण अपेक्षित काम झाले नसल्याची खंत येथील नागरीकांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणुकीत कॉंग्रसने 77 आमदार निवडून आणले होते. मात्र त्यातील 14 आमदारांनी भाजपात प्रवेश केला.त्यांनर कॉंग्रेसमध्ये खांदेपालट झाले. अमित छाबडा यांच्या नंतर जगदीश ठाकूर हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. मात्र महागाई, बेरोजगारी, शिक्षण असे अनेक मुद्दे आहेत जे तळागाळापर्यंत पोहचले नाहीत. मनी, मसल, मेसेज, पॉवर या तंत्राचा वापर निवडणुकीत करण्य़ात कॉंग्रेस फेल ठरली.
‘आप’कडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम
आम आदमी (AAP)पक्षाने गुजरातमध्ये एंट्री केल्य़ानंतर त्याला कॉंग्रसने गांभीर्याने घेतलं नाही. याचं महत्वाच कारण गेल्या निवडणुकीत 29 जागा ‘आप’ने लढवल्या होत्या. मात्र 29 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.यामुळे देखील कॉंग्रसने दुर्लक्ष केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा- Gujrat Assembly Election Results 2022 : गुजरातमध्ये मोदी-मोदींचा जल्लोष, भाजप आघाडीवर
अमित शहांचा फंडा
गुजरातमध्ये हिंदुत्वाची लाट आहे.याचाच फायदा भाजपने घेतला. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी असल्य़ाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी जनतेला पटवून दिलं. याचाही फटका कॉंग्रेसला बसला आहे.दुसर म्हणजे कॉंग्रेसचा वोट शेअर विखुरला तर भाजपचा वोट शेअर वाढला. आणि मतांची टक्केवारी वाढली यामुळे भाजपला गुजरात निवडणुकीत यश मिळाले. या निवडणुकीत आपचा वोट शेअर 12 टक्के आहे.तर कॉंग्रसचा वोट शेअर 27 टक्के आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रसचा वोट शेअर 37 टक्के होता. त्यामुळे आपच्या निवडून आलेल्या जागा या कॉंग्रसच्या आहेत अस मानायला हरकत नाही.
हेही वाचा- गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल
शरद पवार काय म्हणाले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले, भाजपा विरोधात लढण्यासाठी, सक्षमपणे उभा राहण्यासाठी राज्यामध्ये भाजप विरोधी एक विचार असलेल्या पक्षाने एकत्रित यायला हवं आणि पुढं जायला हवयं असा संदेश कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी दिला आहे.
Previous Articleगटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात
Next Article दत्तजयंतीला रशियन दांपत्याची उपस्थिती ठरली लक्षवेधी









