नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान प्रदशिंत करण्यात आलेल्या गुजरातच्या चित्ररथाला लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे. या चित्ररथात धोर्डो पर्यटन गावाची झलक दर्शविण्यात आली होती. 75 व्या प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विविध मंत्रालयांच्या एकूण 25 चित्ररथांना सामील करण्यात आले होते. मायगोव्ह प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेल्या मतदानात 32 टक्के मते प्राप्त करत गुजरातच्या चित्ररथाला सलग दुसऱ्या वर्षी लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे.









