वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरु असलेल्या टेनिस प्रीमियर लीग सांघिक स्पर्धेत सुमित नागलच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुजरात पँथर्सने शेवटच्या चार संघामध्ये स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेत मुंबई, हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सदर स्पर्धा येथील सीसीआयच्या टेनिस कोर्टवर खेळवली जात आहे.









