Gujarat,Himachal Pradesh Election 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे या दोन राज्यामध्ये वाढलेले होते. त्या अनुषंगाने या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये एकत्र निवडणुका होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.
गुजरातची निवडणुक ही नेहमी डिसेंबर महिन्यात होते. मात्र यावेळी ती एक महिना लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आम आदमी पक्षाने या निवडणुकांवर यापूर्वी आक्षेप घेतला होता. भाजप यंदा लवकर निवडणुक घेणार अस त्यांनी म्हटलयं. पंजाब जिंकल्यानंतर आपने गुजरातकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे हि निवडणुक महत्त्वाची असणार आहे. गुजरातच्या विधानसभेमध्ये एकूण 182 जागा आहेत.यामध्ये 92 हा बहुमताचा आकडा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 1998 पासून सलग 24 वर्ष भाजपने हे राज्य जिंकल आहे. सलगपणे एका राज्यात इतकी वर्ष एखाद्या पक्षाने अभूतपूर्व यश मिळवणे ही खूप कमी उदाहरणे असतील.
भाजपसाठी गुजरात ही प्रयोगशाळा आहे असचं म्हणाव लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजप यश मिळवण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत काॅंग्रेसने अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता.काॅंग्रेस 77 जागांपर्यत पोहचले होते. तर भाजपाने 99 जागा मिळवण्यात यश मिळवल होते.त्यामुळे या निवडणुकीत आप, काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता नाकारचता येत नाही.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









