राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे भावी उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी एका वक्तव्यात ही माहिती देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त प्रभार सांभाळण्यासाठी नियुक्त केले आहे. आचार्य देवव्रत हे स्वत:च्या वर्तमान पदासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
67 वर्षीय राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रे•ाr यांना 152 मतांनी पराभूत केले होते. राधाकृष्णन हे आता लवकरच उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समालखा येथे जन्मलेले आचार्य देवव्रत हे भारतीय राजकारणातील दिग्गज नेते राहिले आहेत. गुजरातचे 20 वे राज्यपाल म्हणून ते 2019 पासून कार्यरत आहेत. यापूर्वी ते 2015-19 दरम्यान हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिले होते.









