अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरिवाल यांनी गुजरातच्या आपच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला. इसुदान गढवी याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून आम आदमी पक्षाने राज्यातील केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या गढवी यांच्याबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि सरचिटणीस मनोज सोराटीह्या हेसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात गढवी यांना तब्बल 73 टक्के मते मिळाली आहेत. द्वारका जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या गढवी हे मागास जातीतील असून या जातीची राज्याच्या लोकसंख्येच्या ४८ टक्के आहे. अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी सर्वेक्षण करून मते मागवली होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








