Gujrat Election : आपल्या पहिल्याच रॅलीत सत्ताधारी भाजपवर (BJP) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी भाजपवर टिका करत आदिवासींनी जंगलात राहावे अशी भाजपची इच्छा आहे. असे ते म्हणाले. ते आज सुरतमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले की, आदिवासींनी शहरात राहून त्यांच्य़ा मुलांनी अभियंता व्हावे किंवा इंग्रजी बोलावे हे भाजपला नको आहे. आदिवासींना भारताचे खरे मालक आहेत असे संबोधून गांधी म्हणाले की, भाजप त्यांना “आदिवासी” ऐवजी “वनवासी” असे मानते.
खासदार राहूल गांधी पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान, त्यांना शेतकरी, बेरोजगार तरुण आणि आदिवासी समाजातील लोकांच्या व्यथा आणि वेदना जाणवल्या. ही यात्रा प्रेम, करुणा आणि बंधुत्वासाठी असून त्यात सर्व स्तरातील लोक सामील झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत राहूल गांधी यांचा हा दुसरा गुजरात दौरा असून ते राजकोट शहरात आणखी एका सभेला संबोधित करणार आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








