एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत ‘हिंदुजा’मध्ये हलवले
► वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा एकुलता एक मुलगा अनुज पटेल यांना ‘ब्र्रेन स्ट्रोक’च्या त्रासामुळे अधिक उपचारासाठी सोमवारी सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील हिंदुजा ऊग्णालयात हलवण्यात आले. या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही मुलासोबत मुंबईत पोहोचले आहेत.
37 वषीय अनुज पटेल यांना रविवारी दुपारी 3 वाजता ‘ब्र्रेन स्ट्रोक’ आला. त्यानंतर त्यांना अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे एक शस्त्रक्रिया केल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या हिंदुजा ऊग्णालयात पाठवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अनुज पटेल हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून त्यांचा अहमदाबादमध्ये बांधकाम व्यवसाय आहे.
राज्यपाल, प्रदेशाध्यक्षांकडून विचारपूस
अनुज यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हेही सोमवारी सकाळी केडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांच्या उपस्थितीत अनुजला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला पाठवण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेसुद्धा आपल्या मुलासह मुंबईत रवाना झाल्यामुळे गुजरात गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आता राज्यपाल आचार्य आणि आरोग्य मंत्री हृषिकेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.









