रत्नागिरी प्रतिनिधी
गुजरात येथील मच्छीमारी नौका रत्नागिरीताल जयगड जवळच्या समुद्रात बुडाली.यात दोन खलाशांचा बुडून मृत्यू झाला.तर बचावलेल्या खलाशांना वाचवण्यात कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांना यश आले . ही घटना आज सकाळी जयगड पासून १२० नॉटीकल अंतरावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर असलेल्या ही समुद्रात घडली. नौकेतील बचावलेल्या आणि मृत खलाशांना घेऊन कोस्टगार्डचे अधिकारी मिरकरवाडा बंदरात दाखल झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,
गुजरात येथील मच्छीमारी नौका रत्नागिरीताल जयगड जवळच्या समुद्रात बुडाली.तेव्हा त्यामध्ये एकूण नऊ खलाशी होते. यातील दोन खलाशांचा मृत्यू झाला. तर एकजण बेपत्ता झाला आहे. खलाशांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आणि बोटीच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात आले. बुडालेल्यांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









