अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे नेते केसरीसिंह सोलंकी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आम आम आदमी पार्टीत प्रवेश केला. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा राजीनामा आला आहे.
गुजरातमधील मातर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले केसरीसिंह सोलंकी २०१४ आणि २०१७ अशा दोन सलग निवढणुकांमध्ये निवडूण आले आहेत. भाजपने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करून भाजपने मातर मतदारसंघातून कल्पेश परमार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विद्यमान आमदार सोलंकी भाजपवर नाराज असून त्यामुळे त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षात प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.
गुजरात आपचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी एका ट्विटमध्ये सोलंकी यांचे पक्षात स्वागत केले आहे. “मातर विधानसभेचे लोकप्रिय, कष्टाळू, निडर आमदार केसरीसिंह सोलंकी जी यांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाने प्रेरित होऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. मी केसरीसिंहजींचे आम आदमी पक्षात मनापासून स्वागत करतो. गुजरातमध्ये आम्ही मिळून एक प्रामाणिक सरकार स्थापन करू.” असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








