मसुरे / प्रतिनिधी
Guidance workshop for class 10th students held in Masure
विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कार्यशाळा या आपल्या दहावीच्या जीवनात मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. आज अर्चना कोदेमॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मसुरे परिसरातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनोखा असा उपक्रम मोफत देऊन एक चांगला आदर्श शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केला आहे यापुढेही मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अशा सर्व उपक्रमांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन मसुरे येथे बोलताना मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष उत्तम राणे यांनी दिले.
२ ते ४ मे या कालावधीत कै शरद गोवंडे स्मृती इयत्ता दहावी मार्गदर्शन कार्यशाळा आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे मोठ्या अपूर्व उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उत्तम राणे आणि विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना उमेश कोदे मॅडम यांनी आपले सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे केले. मसुरे, माळगाव, बिळवस, महान, देऊळवाडा, चांदेर, बागायत या गावातील पंचक्रोशीतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. जिल्ह्यातील नामांकित शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा अभ्यास केव्हा व कसा करावा वेळेचे नियोजन कसे करावे परीक्षेत कोणत्या चुका टाळाव्यात तसेच प्रत्येक विषयाच्या अभ्यासातील कृप्त्या व महत्त्वाचे घटक याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या वेळी मार्गदर्शक मराठी सौ नंदिनी साटलकर मॅडम कुडाळकर हायस्कूल मालवण च्या मुख्याध्यापिका, हिंदी श्री सुमंत दळवी सर कनेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक व एस.एस् सी परीक्षा पेपर सेटर, इंग्रजी श्रीमती अनिता फर्नांडिस मॅडम जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण, गणित भूमिती सौ मेघना जोशी मॅडम माजी मुख्याध्यापिका जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, विज्ञान वन- टू श्री बर्डे सर विद्या मंदिर हायस्कूल कणकवली, इतिहास सौ ज्योती तोरसकर ,वेळेचे नियोजन व शारीरिक मानसिक आरोग्य जपणुक सौ अर्चना कोदे मॅडम मुख्याध्यापिका आर पी बागवे हायस्कूल यांनी मार्गदर्शन केले..









