100 हून अधिक विद्यार्थी सहभागी
बेळगाव : पोलीस स्थानकामधील कामकाज कशाप्रकारे चालते, याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. माळमारुती पोलीस स्थानकामध्ये 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, एसीपी सोमेगौडा यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. पोलीस स्थानकाचे कामकाज कशाप्रकारे चालते, याची माहिती देण्यात आली. समाजविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर पोलिसांकडून कशाप्रकारे कारवाई केली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.









