Guidance to farmers under the International Nutritious Cereals Development Programme
वेर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने वेर्ले येथे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी. एस. घाडगे यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत गट यांत्रिकीकरण, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, पिक विमा, महाडीबीटी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड या कृषी योजना बाबतही सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कृषीसहाय्यक मिलिंद निकम यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व व गरज याविषयी सविस्तर माहिती देऊन शेतकरी मासिक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाविषयी तर कृषीसहाय्यक स्वप्निल शिर्के यानी शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळविण्याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सरपंच रुचिता राऊळ यानी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिल्याबद्दल कृषी विभागाचे आभार मानले.
यावेळी.कृषी सहाय्यक सी. एल. राऊळ, शंकर राऊळ, कृषीसहाय्यक अक्षय खराडे, सावंता घेरडे, माजी सरपंच सुभाष राऊळ, ग्रामपंचायत सदस्य ममता राऊळ, चंद्रभागा गोसावी, मनीषा राऊळ, स्नेहा राऊळ, पल्लवी राणे, सुरज लिंगवत, गोविंद लिंगवत, विजय राऊळ, संदीप सावंत, लाडजी राऊळ, दिलीप राऊळ इत्यादी शेतकरीवर्ग व महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी









