अभियांत्रिकी क्षेत्रात आयपीआरची गरज यावर विवेक आनंद सागर यांचे व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय व व्हीटीयूच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आयपीआर सेलतर्फे ‘आयपी फॉर युथ इनोक्हेशन फॉर अ बेटर फ्युचर’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
या कार्यक्रमास बेंगळूर येथील आयपी ऍटर्नी व केएससीएसटीचे सल्लागार विवेक आनंद सागर उपस्थित होते. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आयपीआरची गरज, ते एखाद्या व्यक्तीच्या कल्पनांचे संरक्षण कसे करते व संस्थांना प्रोत्साहन कसे देते, याबद्दल माहिती दिली. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला तसेच आयपीआर व त्यांच्या प्रक्रियेबद्दलच्या शंकांचे निरसन केले.
सीएसई व आयपीआर सेलचे समन्वयक प्रा. नावेद पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील आयपीआर सेलबद्दल माहिती सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा, तज्ञांचे मार्गदर्शन व पेटंट फाईलिंगसाठी आर्थिक साहाय्य महाविद्यालयाकडून दिले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश मश्याळ, अप्लाईड सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. ए. व्ही. कुलकर्णी, एसई विभागाचे प्रमुख प्रा. मणी सी. व शिक्षकवर्ग उपस्थित होता. प्रा. स्वाती पाटील यांनी आभार मानले.









