वार्ताहर /लाटंबार्से
आज झपाटय़ाने जग बदलत आहे. जगाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या प्रगतीच्या मार्गावर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपली तरुण पिढी. वाढत्या वयातील मुले आणि त्यांच्या या भौतिक प्रगतीच्या मार्गावर महत्त्वाचा असा मानले जाते ते म्हणजे तेथे आरोग्य . शालेय वयातील मुलांमधील व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते असे इब्रामपूर येथे स्नेहा गावसनी प्रतिपादले. इब्रामपूर येथे शनिवार दि. 2 रोजी आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमलीपदार्थांचे व्यसन काय आहे? व्यसनाने शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो? त्या मुलांना व व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी पालकांनी तसेच त्याचे मित्र परिवारानी लक्षणाबाबत जागृत होणे आवश्यक आहे . या व्यसनांना बळी पडायच्या अगोदर आपण सर्व प्रकारच्या व्यसनांना खंबीरपणे नकार देणे गरजेचे आहे. कोणता मार्ग आपल्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो तर कोणता मार्ग अधोगती आणणारा याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे गावस म्हणाल्या.
यावेळी मुख्याध्यापिका कवीता चौकेकर यांच्या उपस्थितीत शिक्षक सुधीर नाईक ,संदेश परब , रामदास वरक, शांभवी सापळे , संगीता परब व बीएड प्रशिक्षणाची यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.









