उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
बेंगळूर : जगभरात संघर्षाच्या परिस्थिती निर्माण झाल्या असून मानवताच धोक्मयात आली आहे.अशा परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जैन ऋषींचे मार्गदर्शन आवश्यक आहे. जैन धर्म संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो. श्र्रवणबेळगोळ येथील बाहुबलीची मूर्ती केवळ जैन धर्म आणि परंपरेचे प्रतीक नाही तर जागतिक शांतीचा संदेश पसरवण्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन केले आहे. हासन जिल्ह्यातील श्र्वणबेळगोळ येथे आचार्य 108 शांती सागर महाराजांच्या भेटीच्या शताब्दी कार्यक्रमात भाग घेऊन त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करून ते बोलत होते.
दरम्यान, उपराष्ट्रपतींनी चौथ्या टेकडीचे नाव शांती सागर टेकडी असे ठेवणाऱ्या दगडी फलकाचे अनावरणही केले. ते पुढे म्हणाले, श्र्रवणबेळगोळ आणि संपूर्ण कर्नाटक ही अतिशय पवित्र स्थळे आहेत. देशाच्या कला,संस्कृतीचे जतन आणि विकास करण्यात कन्नडीगांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार ‘ज्ञान भारतम’ मोहिमेंतर्गत प्राचीन भाषांच्या पुनऊज्जीवनावर अधिक भर देत आहे. भाषा, संशोधन आणि विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे जैन धर्मातील प्राचीन साहित्य आणि हस्तलिखितांचे संशोधन आणि अभ्यासात मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
बेंगळुरात उपराष्ट्रपतींचे राज्यपालांकडून स्वागत
उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी पहिल्यांदाच कर्नाटकचा दौऱ्यावर होते. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यलहंका येथील हवाई दल तळावर उतरले. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, मंत्री भैरती सुरेश यांच्यासह इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.









