पोलीस आयुक्तांकडून तंत्रज्ञानाचे विश्लेषण
बेळगाव : गुन्हे तपास विभागाच्या अधिकारी व पोलिसांना बुधवारी तपास कामात तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर सीईएन विभागाचे एसीपी जे. रघु, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी आदींसह शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकातून आलेले उपनिरीक्षक, हवालदार व पोलीस उपस्थित होते. गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करता येतो. सीडीआर, आयपीडीआर, सीसीटीव्हीच्या विश्लेषणासह सोशल मीडिया व मोबाईलच्या विश्लेषणातून कसा तपास करता येतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.









