समूत्कर्षण ट्रस्टतर्फे 5 रोजी उपक्रम
खानापूर : खानापूर तालुक्मयातील विद्यार्थी आयएएस परीक्षेसाठी तयार व्हावेत यासाठी समुत्कर्षण या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. खानापूर येथील लोकमान्य भवनात सकाळी 10 वा. तर बिडी येथील ज्ञानेश्वर कल्याण मंडप येथे दुपारी 2 वा.कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अॅड. चेतन मणेरीकर, सुभाष देशपांडे, महेश बिडकर, विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका वाळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मणेरीकर म्हणाले, समुत्कर्षण या संस्थेच्या माध्यमातून देशाच्या विविध शहरात तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आयएएस, आयएफएस, आयआरएस, आयपीएस यासह राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत तयार व्हावेत या दृष्टीने कार्य करत आहे. युपीएससीच्या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षणापासूनच पाया रचला जावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. याबाबतची पालकांत जागृती व्हावी यासाठी समुत्कर्षण या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खानापूर तालुक्मयातही हुशार विद्यार्थी आहेत. युपीएससीच्या परीक्षेसाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत या दृष्टीने तालुक्मयातील इयत्ता सहावी ते बारावी या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर संस्थेने आयोजित केले आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हे शिबिर होणार आहे. तरी तालुक्मयातील विद्यार्थी व पालकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी दिव्या नाडगौडा, ऊमा घारशी, आर. रजत, विश्वनाथ पुजार, टी. एन. बडीगेर उपस्थित होते.









