रग्नागिरी
अमेरिकेत ५ नोव्हेंबर २०२४ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढवलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपुत्र संतोष दिनकर साळवी हे बोस्टनजवळील न्यू हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार झाले आहेत. एका मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवून ऐतिहासिक विजय मिळविल्याने त्यांचा जामसूत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामदेवता देवस्थान व गुहागर तालुका मराठा समाजातर्फे सन्मान करण्यात आला.








