मणेराजूरी / वार्ताहर
Sangli Accident News : योगेवाडी ता.तासगाव जवळ गुहागर -विजापूर या राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटक येथील रडारेड्डी (ता. अथणी) येथील संभाजी हाजीबा सावंत (वय-55) यांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो धडकेत पलटी झाला .अपघातानंतर तासगाव पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत संभाजी सावंत हे दुचाकीवरून तासगावच्या दिशेने नातेवाईकांच्याकडे निघाले होते.तर वाळवा येथून द्राक्षे भरून आंध्रप्रदेश मधील टेम्पो तासगावकडून कवठेमंकाळच्या दिशेने निघाला होता.गुहागर-विजापूर महामार्गावर मणेराजुरी आणि योगेवाडीच्या हद्दीवर,शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.या धडकेत दुचाकीस्वार सावंत रस्त्यावर उडून पडले यामध्ये त्यांचा जागीच मूत्यू झाला. तर द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावरून पलटी झाला.या घटनेनंतर मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली आणि योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांना ही माहिती कळवली.माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी येत सदर घटनेचा पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








