प्रतिनिधी / बेळगाव : महाविद्यालयात शिकविण्याकरिता आधीच्या अतिथी प्राध्यापिकाच हव्यात, सरकारी प्राध्यापिका नको अशी मागणी करत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंडित नेहरू पियू कॉलेजच्या विध्यार्थ्यानी निदर्शने केली.
शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर विध्यार्थ्यानी घोषणाबाजी करून न्यायाची मागणी केली आणि ठिय्या मांडले. (फ्लो)
आम्हाला आधीच्याच प्राध्यापिका हव्यात. त्यांनी जे काही शिकविले ते आमच्या लक्ष्यात राहते. पण आता सरकारने त्यांच्या जागी नवीन प्राध्यापिकांची नियुक्ती केली आहे. शैक्षणिक वर्ष संपायला फक्त ४ महिने शिल्लक आहेत. अशा वेळी नव्याने प्राध्यापिकांची नियुक्ती केली असून यामुळे विध्यार्थ्याचे भवितव्य संकटात सापडले आहे.
पंडित नेहरू कॉलेजची अतिथी प्राध्यापक धनश्री गरडे एका आई प्रमाणे मुलांची काळजी घेतात. त्यांची शिकवण चांगली आहे. जर कोणी विध्यार्थी कॉलेजला येऊ शकत नाहीत तर, त्यांच्या घरी जाऊन त्यांची समस्या दूर करून कॉलेजला येण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे सरकारी प्राध्यापकांपेक्षा त्यांचीच गरज आहे. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.









