मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करताना फेरबदल केले आहे. मुख्यता भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात येऊन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांची मागणी मान्य अद्याप मान्य करण्यात आली ते अजूनही वेटिंगवर आहेत. नाशिकचे पालकमंत्रीपद सध्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असून यात 7 मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्याबरोबर भाजपच्या गिरीश महाजन आणि यांनीही दावा केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत मतभेद असल्याच्या राजकिय चर्चा असून त्यामुळे या जिल्ह्यातील पदांच्याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. कोल्हापूरसाठी आग्रही असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात येउन त्यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील








