रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हयात राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धा होत असल्याने आनंद होतोय.या खेळाडूंना लागेल ते सहकार्य करण्यात येईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्टस असोसिएशन यांच्या मान्यतेने 33 वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मुले व मुली क्युरोगी आणि ९ वी ज्युनिअर पुमसे तायक्वाँदो चॅम्पियनशिप 2023-24 या स्पर्धेस जिल्हा क्रिडा संकुल येथे आज राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, धुलीचंद मेश्राम, वेंकटेश्वरराव कररा, नीरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर, बिपिन बंदरकर, राजन शेट्ये, तुषार साळवी, अभिजीत दुड्ये, निमेश नायर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. जिल्हा क्रिडा संकुलात सुरू झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.









