सातारा प्रतिनिधी
पोवई नाक्यावरील वाद शिगेला पोहचला असताना आता तो मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत गेलाय. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचेही स्मारक असू नये, दुसरे काही झाले तरी जनक्षोभ उसळेल असे मुख्यमंत्र्यांना सांगितलेय.
या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालकमंत्री काय निर्णय देणार? बैठकीवेळी काय घडणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींचे आणि सातारा जिल्हावासयांचे या विषयाकडे लक्ष लागून राहिले आहे.