Kolhapur News : शालेय शिक्षण,मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर आज जिल्हा दौऱ्यावर येत असून कोल्हापूरतील दंगलीचा ते आढावा घेणार आहेत. या बैठकित जिल्हा प्रशासनाला सूचना देणार आहेत.
आज बुधवारी रोजी दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर ते विमानतळ येथे येतील. त्यानंतर सायं. 4.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पोहचतील. संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर येथील परिस्थिती नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.