फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची आकडेवारी सादर : येणाऱ्या काळातही तेजी राहण्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीएसटी सुधारणा आणि नवरात्रीमुळे कार विक्रीला चालना मिळाली असून पीव्ही विक्रीत 5.8 टक्के वाढ झाली आहे. पीव्ही विक्री 8 टक्क्यांनी वधारली आहे. माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विक्रीत 7टक्के, टाटा मोटर्समध्ये 26टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 5टक्के वाढ झाली. त्याच वेळी, याविरुद्ध पाहता ह्युंडाईच्या विक्रीत मात्र 8 टक्के घट झाली.
जीएसटी 2.0 सुधारणा आणि नवरात्रोत्सवामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 5.8टक्के वाढून 2,99,369 युनिट्स झाली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) ने मंगळवारी वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली.
दुसरीकडे, दुचाकी, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांमध्ये अनुक्रमे 6.5टक्के, 3.6टक्के आणि 2.6टक्के वाढ झाली, तर तीनचाकी वाहने आणि बांधकाम उपकरणे अनुक्रमे 7.2 टक्के आणि 19टक्केनी घटली. एकूणच, सप्टेंबर 2025 मध्ये ऑटोमोबाईल किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी वाढली.
नवरात्री दरम्यान विक्रमी गर्दी
फाडाचे उपाध्यक्ष साई गिरिधर म्हणाले, ‘पहिल्यांदाच, देशभरातील डीलरशिपमध्ये नवरात्री दरम्यान विक्रमी गर्दी आणि डिलिव्हरी दिसून आल्या, एकूण किरकोळ विक्रीत वर्षाच्या आधारावर 34टक्के वाढ झाली. कोणत्याही सणासाठी हा ऐतिहासिक उच्चांक आहे.’
नवरात्रीच्या दिवसांत सुमारे 1.15 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली, गेल्या वर्षी 8,63,000 युनिट्सची विक्री झाली होती. दुचाकी वाहनांनी विक्रीत आघाडी घेतली असल्याचे दिसले असून 36टक्के वाढ झाली, कार 35 टक्के आणि व्यावसायिक वाहनांनी 15 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे.
गिरिधर म्हणाले, ‘पहिले तीन आठवडे तुलनेने मंद होते, कारण ग्राहक जीएसटी 2.0 सुधारणांची वाट पाहत होते. परंतु शेवटच्या आठवड्यात नवरात्र उत्सव आणि कमी जीएसटी दरांमुळे ग्राहकांच्या भावना पुन्हा जागृत झाल्या असल्याचे चित्र तयार झाले आहे.









