क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बिदर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या जीएसएस संघाने उपविजेतेपद पटकाविले. राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगाव, बेंगळूर, कारवार, मंड्या आणि कोलार या ठिकाणाहूनही अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगाव एसकेई सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेसाठी या खेळाडूंसमवेत प्रा. अनघा वैद्य संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.









