बेळगाव :
जीएसएस कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर हे छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. नूतन प्राचार्य म्हणून अभय सामंत यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. अरविंद हलगेकर यांनी जीवशास्त्राचे समन्वयक व एनसीसी अधिकारी म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली. नूतन प्राचार्य अभय सामंत हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. पदव्युत्तर रसायनशास्त्राचे समन्वयक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. नूतन प्राचार्यांना एसकेई सोसायटीचे सचिव मधुकर सामंत, एस. वाय. प्रभू, ज्ञानेश कलघटगी, द. म. शि. संस्थेचे विक्रम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.









