नवी दिल्ली :
2025 चा भारताचा विकास दर 5.5 ते 6.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी मूडीज यांनी नव्याने मांडला आहे. रेटिंग एजन्सीने फेब्रुवारी भारताचा विकास दर कमी करुन 6.6 टक्के इतका घोषित केला होता. आता एजन्सीने पुन्हा आपला नवा अंदाज घटवला आहे. कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये जीडीपी दर 5.5 ते 6.5 टक्के इतका राहणार असल्याचे मूडीज यांनी म्हटले आहे. अमेरिकेकडून व्यापार शुल्क आकारले जात असून सध्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण पहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर मूडीजने नव्याने जीडीपीचा अंदाज सांगितला आहे. आयात निर्यात धोरणावर आगामी परिणाम होणार असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.









