वृत्तसंस्था/ मुंबई
डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रामधले व्यवहार अलीकडच्या काही काळामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले असून या वाढीमुळे 2023 पर्यंत कंपनी नफ्यामध्ये येऊ शकते अशा प्रकारचा विश्वास पेटीएमचे संस्थापक विजय शंकर शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या एक वर्ष कालावधीमध्ये आपल्या संघ सहकाऱयांनी उत्तम पद्धतीने काम केलेले आहे. कंपनीच्या महसूलामध्ये बऱयापैकी वाढ झाली असून डिजिटल पध्दतीने देवाण-घेवाण वाढत आहे. पेडिट व्यवसायामध्येही गुंतवणूक केली जात आहे. संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणाले, की कंपनी आता आपला व्यवसाय बऱयापैकी गती घेत असून 2023 मध्ये डिजिटल पेमेंटच्या वाढत्या व्यवसायामधून उत्तम प्रकारे नफा कंपनीला प्राप्त करणे साध्य होणार आहे. मागच्या गुरुवारी शेअर बाजारामध्ये लिष्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच आपला वार्षिक अहवाल कंपनीने मांडला होता. यानंतर त्यांनी आपले लक्ष हे ऍपवर केंद्रित असणार आहे, यावरच फास्टटॅग आणि ‘बाय नाऊ पे लेटर’ सारख्या सुविधाही दिल्या जात असून याचे ग्राहकांनी स्वागत केले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.









