निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार उत्तम पाटील यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काल गुरुवार दि. २८ रोजी निपाणी शहरातील वाणी मठ, जाधव नगर येथील नागरिकांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. उत्तम पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यांवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला.
यावेळी उमेदवार उत्तम पाटील यांनी आपल्याला पाठिंबा दर्शविल्याने कार्यकर्त्यांचे आभार मानले. या पुढेही अशाच प्रकारे निःस्वार्थ समाजसेवा करण्याचे आश्वासन दिले.










