सिग्नेचरला उपविजेत्या पदावर समाधान: प्रशांत पाटील गोल्डन बुटचा मानकरी
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत पॅबलिग चषक निमंत्रतांच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ग्रो स्पोर्ट्स संघाने 19 गुण व सर्वाधिक गोलांच्या सरासरीवर फॅबलिग चषक पटकाविला आहे, तर सिग्नेचर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानवे लागले. ग्रो स्पार्टसच्या प्रशांत पाटील हा गोल्डन बुटचा मानकरी ठरला आहे. वडगाव येथील सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरियाना टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामने खेळविण्यात आले. पहिल्या सामन्यात भारत एफसीने डिसाईडरएफसीचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर आकाशने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अकराव्या मिनिटाला आकाशच्या पासवर अभिषेकने दुसरा गोल करून पहिल्या सत्रात 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. 23 व्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर आकाशने तिसरा गोल करून 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबने केआर शेट्टी किंग्ज्स संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला सिग्नेचरच्या अतीबच्या पासवर अल्तमशने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 25 व्या मिनिटाला अल्तमशच्या पासवर अतिफने दुसरा गोल करून 2-0 भक्कम आघाडी मिळून दिली. तिसऱ्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्सने राहुल के आर शेट्टी संघाचा 2-0 असा पराभव केला. त्या सामन्यात तेराव्या मिनिटाला हाजीजच्या पासवर प्रशांत पाटीलने पहिला गोल करून दिला. सतराव्या मिनिटाला प्रशांत पाटीलच्या उत्कृष्ट पासवर हाजीजने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या सामन्यात टेनटेन एफसीने ओल्ड फाटाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला किरण तारळेकर तर बाराव्या मिनिटाला निखिल नेसरीकरने गोल करून 2-0 आघाडी मिळवून दिली. 19 व्या मिनिटाला ओल्ड फाटाच्या कौशिक पाटीलच्या पासवर प्रद्युमने गोल करून 1-2 अशा आघाडी कमी केली. पाचव्या सामन्यात भारत एफसीने साईराज वॉरियर्सचा 4-2 असा पराभव केला. भारत एफसी तर्फे ओमकारने 2, अमृत व जयदेव यांनी प्रत्येकी एक गोल केला. साईराज वॉरियसर्फे नागेश व ब्र्रेन यांनी गोल केला. सहाव्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबने ओल्ड फाटाचा 4-2 असा पराभव करून गुणतालिकेत खळबळ माजवली. सिग्नेचरतर्फे अल्तमशने 2, कुशल व आदित्य आणि प्रत्येकी एक गोल केला. तर ओल्ड फाटातर्फे कौशिक पाटील व सौरभ यांनी गोल केले
साखळी सामन्यानंतर गुणाच्या आधारे विजेतेपद ठरविण्यात येते पण यावेळी अटीतटीच्या लढतीमुळे दोन संघांची गुण समान झाल्याने गोल मारलेल्या सरासरीवर विजेतेपद ठरविण्यात आले. ग्रो स्पोर्ट्सने 9 सामन्यात 6 सामने विजय, एक बरोबरी, दोन सामने पराजित एकूण 19 गुण, तर सिग्नेचर संघाचे ही गुण फलक समान झाल्याने नियमानुसार ज्या संघाने सर्वाधिक गोल केले असतील त्यावर निर्णय घेण्यात येतो त्यानुसार ग्रो स्पोर्ट्सने 18 गोल तर सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबने सात गोल केले होते, त्यामुळे ग्रो स्पोर्टस्ला विजेतेपद ठरविण्यात आले, सिग्नेचर स्पोर्टसला उपविजेतेपद, 17 गुण व 11 गोलासह राहुल के आर शेट्टी तिसऱ्या स्थानावर, तर टेनटेन स्पोर्ट्सने 17 गुण व तीन गोलासह चौथा क्रमांक पटकाविला.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दर्शन ग्रुपचे संस्थापक श्रीकांत देसाई, माजी उपमहापौर, आनंद चव्हाण, विंग कमांडर रवींद्रनाथ, सीआर सेव्हनचे संचालक प्रशांत मुनवळ्ळी , प्रदीप मुनवळ्ळी, निखिल देसाई, मुकुंद पुरोहित, मानसा पुरोहित यांच्या हस्ते विजेत्या ग्रो स्पोर्ट्स संघाला रोख रक्कम, आकर्षक चषक, उपविजेत्या सिग्नेचर स्पोर्ट्स संघाला रोख रक्कम चषक, तिसरा क्रमांक पटकाविले. राहुल के आर शेट्टी व चौथा क्रमांक टेनटेन स्पोर्ट्स यांना चषक प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तीक बक्षिसे पुढील प्रमाणे
उगवता फुटबॉलपटू- जयदेव सुळगेकर भारत एफसी, उत्कृष्ट गोलरक्षक- सोहम ओऊळकर सिग्नेचर, उत्कृष्ट डिफेंडर- राजेश पाटील टेनटेन, उत्कृष्ट फिडफील्डर-अनास बिस्ती राहुल केआर शेट्टी, उत्कृष्ट फॉरवर्ड-अल्तमाश जमादार सिग्नेचर स्पोर्ट्स, गोल्डन बूट विजेता- प्रशांत पाटील ग्रो स्पोर्ट्स, उत्कृष्ट संघ- ओल्ड पाटज यांना चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धे यशस्वी करण्यासाठी विजय रेडेकर, अमरदीप पाटील, ओमकार खांडेकर, यश सुतार, शुभम यादव, विवेक सनदी, पवन रायकर, रजत खारकर, निलेश साळुंखे यांनी विशेष परिश्र्रम घेतले.









