क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोधराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत फॅब चषक सेव्हन ए साईड साखळी फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिनी ग्रो स्पोर्ट्स, सिग्नीचर एफसी, राहुल के. आर. शेट्टी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभव करीत विजयी सलामी देत वडगाव येथील सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरिना मैदानावरती आयोजित या साखळी स्पर्धेत 10 संघांचा सहभाग आहे.या स्पर्धेमध्ये ग्रो स्पोर्ट्स एफसी, भारत एफसी, सिग्नीचर स्पोर्ट्स क्लब, रॉ फिटनेस एफसी, ओल्ड फाटाज, डिसाईडर्स, टेन टेन एफसी, साईराज वॉरियर्स, के. आर. शेट्टी किंग्ज व राहुल के. आर. शेट्टी या संघांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुरस्कर्ते विजय रेडेकर अमरदीप पाटील, शुभम यादव, ओंकार कुंडेकर, यश सुतार, विवेक सनदी, साहिल मांगले, रजत कऱ्हाडकर यांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून व चेंडू कीक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान 45 साखळी सामने खेळविण्यात येणरा आहेत. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्सने भारत एफसीचा 2-0 असा पराभव केला. ग्रो स्पोर्ट्सतर्फे रहात मुगतखान व इरफान बिस्ती यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात सिग्नीचर स्पोर्ट्स रॉ फिटनेसचा 2-0 असा पराभव केला. सिग्नीचरतर्फे अल्तमश जमादार व मुश्ताक अहमद यांनी गोल केला. तिसऱ्या अटीतटीच्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टीने के. आर. शेट्टी किंगचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात राहुल के. आर. शेट्टीतर्फे महमद बिस्तीने 2 गोल केले. तर के. आर. शेट्टीतर्फे इमाद अहमने याने 1 गोल केला.









