न्हावेली / वार्ताहर
न्हावेली येथील शिरोडा मुख्य रस्ता ते चौकेकरवाडी व मुख्य रस्ता ते निर्गुणवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याचे जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग व भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.जन सुविधा योजनेच्या माध्यमातून या रस्त्यासाठी तब्बल दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर,माजी सरपंच सौ.प्रतिभा गावडे,माजी उपसरपंच संतोष नाईक,भाजप शक्ती केंद्रप्रमुख अजित चौकेकर, बुथ प्रमुख गीतेश परब , सद्गगुरु सावळ,दिपक नाईक,आत्माराम नाईक,राजन कालवणकर ,संजय दळवी,महादेव चौकेकर,आरती माळकर, निकीता परब,सुरेश दळवी,रविकांत केरकर,मंदार नाईक , बाबाजी निर्गुण,दिगंबर परब,सुरेश बोंद्रे, वसंत मुळीक,तसेच ग्रामपंचायत सदस्य,भाजप कार्यकर्ते,व ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Articleव्हीलचेअर क्रिकेट संघात साकुर्डेच्या सुरेश जोशीची निवड
Next Article दामले विद्यालयाचे घवघवीत यश









