न्हावेली / वार्ताहर
गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या मळगांव ब्राह्मणपाट या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले असून आज सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रस्त्याच्या नूतनीकरणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकीता निलेश राऊळ, माजी सरपंच निलेश कुडव, गणेश प्रसाद पेडणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, एकनाथ खडपकर, सिद्धेश तेंडोलकर, दीपक जोशी, सुदेश राऊळ, संजय जोशी, गुरुनाथ राऊळ, गजा सावंत, भगवान रेडकर, निलेश राऊळ, मदन राऊळ, प्रसाद नाईक, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, सुहास पेडणेकर, दिलीप राऊळ, विलास नाईक, बिपिन नाईक, भरत जाधव, बाळा राणे, विष्णू गावडे, बाळा परब, बापू राऊळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुमारे १५०० मीटर लांबीचा हा रस्ता मंजूर झाला असून, त्यासाठी अंदाजित १ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला हा रस्ता अखेर मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Previous Articleकडेगावात अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र
Next Article चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक









