वेंगुर्ले (वार्ताहर)-
माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून होडावडा – पुनदळवीवाडी येथील गणेश विसर्जन घाटासाठी प्राप्त झालेल्या १२ लाख रूपयांच्या निधीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले .होडावडा-पुनदळवीवाडी येथील गणेश विसर्जन घाटासाठी निधी प्राप्त होण्यासाठी आमदार दिपक केसरकर यांच्याकडे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार निधीसाठी पाठपुरावा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला होता. त्यानुसार १२ लाख रूपयांचा निधी या कामास मंजूर झाला होता. भूमिपूजन प्रसंगी होडावडा सरपंच सौ. रसिका केळुस्कर, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, विभाग प्रमुख संजय परब, रवींद्र केळुस्कर, मितेश परब, आनंद दळवी, पांडुरंग दळवी, सुभाष दळवी, केशव दळवी, गुरुनाथ दळवी, सौ राधिका दळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .









