मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्याकडून स्पष्टीकरण
पणजी : पाणी टँकरबाबत जलस्रोत खात्याने महत्त्वाची जाहीर सूचना प्रकाशित केली असून जनतेने सावधगिरी बाळगावी असे बजावले आहे. सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक वापरासाठी जिथे पाणी कमी पडते तेथे ते टँकरने पुरवण्याची सोय करण्यात येते. त्या करीता भूगर्भ जल अधिकाऱ्यांकडून परवाना घेणे आता बंधनकारक करण्यात आले असून पाणी पुरवण्याचे काही निकष ठरवण्यात आले आहेत, त्याची खातरजमा जनतेने करावी, असे आवाहन खात्याने केले आहे. टँकर हा स्टेनलेस स्टीलचा असावा आणि तसेच प्रमाणपत्र आरोग्य खात्याने व भूगर्भ जल अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे. ते पाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रक्रिया प्रकल्पातून भरण्यात आलेले असावे. तसे प्रमाणपत्र म्हणजे परवाना भूगर्भ जल अधिकाऱ्याने दिला पाहिजे आणि तो टँकरच्या प्रथमदर्शनी भागावर चिकटवणे बंधनकारक केले आहे. वरील तिन्ही नियम टँकरचालकांनी पाळावेत, असे खात्याने सूचित केले आहे.
तालुकावार भूगर्भ जल अधिकारी
- पेडणे, बार्देश, तिसवाडी
- नाझारेथ वाझ
- संपर्क : 9823096258
- डिचोली, सत्तरी
- के. पी. नाईक
- संपर्क : 9423314359
- फोंडा, काणकोण, केपे,
- सांगे, धारबांदोडा
- कृष्णकांत पाटील
- संपर्क : 9420690015
- सालसेत, मुरगांव
- राजन कांबळे
- संपर्क : 9423059015








