वृत्तसंस्था /लियॉन (फ्रान्स)
फ्रेंच फुटबॉल क्लबस्तरीय क्षेत्रात आघाडीचा क्लब म्हणून ओळखला लियॉन फुटबॉल क्लब गेल्या काही दिवसापासून नव्या प्रशिक्षकाच्या शोधात झगडत आहे. दरम्यान इटलीचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू फॅबिओ ग्रोसो बरोबर लियॉन क्लबने नुकताच नवा करार केला आहे. आता ग्रोसो हे लियॉन फुटबॉल क्लबचे नवे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. यापूर्वी लियॉन फुटबॉल क्लबला लॉरेंट ब्लॅंक हे प्रशिक्षक होते. काही वैयक्तिक समस्येमुळे ब्लँक यांनी आपले प्रशिक्षकपद सोडले होते. लियॉन क्लबने ग्रोसो यांच्यासमवेत 1 वर्षासाठी नवा करार केला आहे. 2006 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या इटली संघामध्ये ग्रोसो यांचा समावेश होतो.









