प्रतिनिधी/वार्ताहर/ बेंगळूर
200 युनिट मोफत वीज देणाऱ्या राज्य सरकारच्या गृहज्योती योजनेसाठी रविवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनद्वारे अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिकांना सोयीचे व्हावे, यासाठी रविवारीही केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी सेवा सिंधूमध्ये स्वतंत्र पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर मोबाईलवरही या योजनेसाठी अर्ज भरता येतो. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलमधील खास डिझाईन केलेल्या वेबपेजवर लॉग ईन करावे लागणार आहे. त्या पोर्टलवर विनंती केलेली माहिती देऊन योजनेसाठी नोंदणी करता येते.
गृहज्योती मोफत योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी घरगुती चालू वीजबिल आणि आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक आणि वीज जोडणीचा खाते क्रमांक विचारला जाईल. याशिवाय खातेदाराचे नाव, एस्कॉमचे नाव (वीजपुरवठा कंपनी) विचारले जात आहे. तसेच नोंदणीसाठी अन्य कोणतेही कागदपत्र मागितलेले नाहीत.
गृह ज्योती योजनेच्या नोंदणीसाठी नेट सेंटर किंवा वीज कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या काही मिनिटांत मोबाईल किंवा लॅपटॉपवर नोंदणी करता येते. याव्यतिरिक्त ग्राम वन, बेंगळूर वन, कर्नाटक वन केंद्र किंवा कोणत्याही वीज कार्यालयात नोंदणी करता येते. 200 युनिट मोफत वीज मिळविण्यासाठी प्ttज्://sान्asग्ह्प्ल्gs.क्arहूक्a.gदन्.ग्ह या लिंकद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोंदणी कशी करावी?
सेवासिंधु पोर्टलच्या वेबपेजवर गेल्यावर त्याठिकाणी गृह ज्योती नोंदणी लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर नोंदणी पृष्ठ उघडेल. तेथे खातेदार क्रमांक टाकला की वीज कनेक्शन, खातेदाराचे नाव, पत्ता सर्व येईल. त्यानंतर, तुम्ही भाडेकरू आहात की मालक आहात, आधार क्रमांक टाका आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांक द्या. त्यानंतर आधार ध्ऊझ् आणि मोबाईल नंबर ध्ऊझ् येईल. त्यांची पडताळणी करून अर्ज सादर केल्यानंतर, नोंदणी पूर्ण केली जाईल.
कोण पात्र आहे?
या योजनेसाठी सर्व इलेक्ट्रिकल गृह खरेदीदार पात्र आहेत. व्यावसायिक इमारतींसाठी कोणतीही सुविधा नाही. नोंदणीबाबत कोणताही गोंधळ असल्यास हेल्पलाईन क्रमांक 1912 वर संपर्क साधू शकता. लाभार्थी भाडेकरू असल्यास, सेवा सिंधू पोर्टलवर त्यांच्या निवासी पत्त्याची पुष्टी करून त्यांचा आधार क्रमांक लिंक करून आणि नोंदणी करून ही सुविधा मिळवू शकतात.
नोंदणीनंतर पुढे काय?
नोंदणी केल्यानंतर वीजपुरवठा कंपनीचे कर्मचारी येऊन अर्ज तपासतील. मासिक मोफत वापराचे युनिट, मागील एका वर्षातील विजेची सरासरी रक्कम घेऊन निर्धारित केले जाते. त्यानंतर ही योजना अधिकृत होईल.
अर्ज प्रक्रियेत अडथळा
पहिल्याच मोठ्या संख्येने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे आल्याने सेवासिंधू पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. सर्व्हर सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तांत्रिक तज्ञांना पाचारण केले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून गृहज्योती योजना सादर केल्यानंतर काही क्षणातच पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला.









