प्रतिनिधी/ बेळगाव
कृषीपंपधारक ग्राहकांची तक्रार निवारण बैठक मंगळवार दि. 3 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कृषीपंपधारक शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार असल्याने शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.









