पोलीस कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था/बारामुल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 1.05 च्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बारामुल्ला शहरातील न्यायालयाच्या ‘मलखाना’मध्ये (पुरावा कक्ष) ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून स्फोटप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंचे नमुने गोळा केले आहेत.









