आळते / वार्ताहर
हातकणंगले येथे प्रशासनाच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा निमित्त आज दि. ६ मे रोजी सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहुन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सकाळी साडेनऊ वाजता हातकणंगलेच्या तहसिलदार कल्पना ढवळे-शिंदे व पोलीस निरीक्षक महादेव तोंदले सर्व स्टाफसह अभिवादन स्थळी हजर झाले. पोलीसांनी हातकणंगले येथील बस स्टॅण्ड समोरून सांगली-कोल्हापुर मार्गावरील वाहतूक थांबवली. त्यानंतर तहसिलदार कल्पना ढवळे- शिंदे यांनी स्पीकरवरून शंभर सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता व्यक्त करण्याची विनंती केली. यावेळी दहा वाजता शेकडो नागरिकांनी स्तब्धता पाळून कृतज्ञता व्यक्त केली . त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









