सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. बेळगाव टिळकवाडी येथील कावळे हॉस्टेल येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष अंकुश केसरकर,सरचिटणीस श्रीकांत कदम,उपाध्यक्ष गुंडू कदम, वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, आकाश भेकणे, महेश चौगुले,आनंद पाटील, इंद्रजित धामणेकर, प्रतीक पाटील अश्वजीत चौधरी आदी यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी उपस्थिती दर्शविली.









