कोल्हापूर :
प्रेमाचा संदेश व मैत्रीचे नाते दृढ करणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ शुक्रवार दि.14 रोजी साजरा होत आहे. यादिवशी आपल्या मित्र, मैत्रीण, जोडीदाराला देण्यासाठी लागणाऱ्या नाविन्यपूर्ण ग्रीटींग कार्ड, टेडी बेअर, किचेन्स, रेंग, ब्रेसलेट आदोसह वेगळेपण व आकर्षक भेटवस्तुंनी शहरातील प्रमुख गीफ्ट हाऊसची दुकाने सजली आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने गुलाब फुल, चॉकलेट, केक, प्रेमचा संदेश देणाऱ्या वस्तूंना मागणी अधिक आहे. भेटवस्तूंसह सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे 14 रोजीला सुरू होत असला तरी बहुतांश तरूणाईकडून शुक्रवार दि. 7 रोजीपासूनच ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा केला जात आहे. यामध्ये पहिल्या दिवशी प्रपोझ डे यानंतर चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, रोज डे आदी दिवस साजरे केले जातात. यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील गीफ्ट हाऊसमध्ये तरूणाईची गर्दी होत आहे. यंदाही ट्रेंडी भेटवस्तू खरेदी करण्याकडे तरूणाईचा अधिक कल दिसून येत आहे.

शहरातील शाळा–महाविद्यालयांचा परिसर, कॉफी हाऊसेस, मॉलमध्ये सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चे वातावरण तयार झाले आहे. अनेकांनी व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे आयोजन केले आहे. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान, रूग्णांना फळे वाटप, गरजूंना जेवन आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तर काहोनी गेट टूगेदर, पार्टी व खास डिनरसाख्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यंदा हॅण्डमेड गिफ्टसला तरुणाई पसंती देत असून म्युझिकल ग्रीटिंग्ज, फोटोफ्रेम 50 रूपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत आहेत. तर चॉकलेट बॉक्स 200 ते 1 हजारापर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

- या वस्तूंना मागणी अधिक
व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाचे फुल भेट देण्याकडे अधिक कल आहे. त्याचबरोबर फोटो फ्रेम, नावाच्या रिंग, ब्रेसलेट, ग्रिटिंग कार्डस्, स्टिकर्स, कॉफी मग, टेडी बेअर, मॅसेज बॉटल, म्युझिकल कपल टेडी, विलमॅच, किचन टेडी, मेसेज बॉक्स, म्युझिकल ग्रिटिंग, डायरीज, मॅसेज बॉक्स, मॅझिक कार्ड, कपल शोपीस आदी वस्तूंना मागणी वाढली आहे. केक, चॉकलेट, मिठाईच्या पदार्थांनाही मागणी आहे. चॉकलेट रोझेस, कॅन्डल्स, ज्वेलरीचे आकर्षण अधिक आहे.
- असे आहेत दर
गुलाब फुल : 50 ते 100 रूपये डझन
टेडी बेअर : 20 ते 1 हजार रूपये
पांडा टेडी बेअर : 90 ते 700 रूपये
रिंग–ब्रेसलेट : 50 ते 2 हजार रूपये
चॉकलेट बॉक्स : 200 ते 2 हजार रूपये
किचन : 10 ते 300 रूपये
शो पीस : 500 ते 2 हजार








