प्रतिनिधी /म्हापसा
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आमदार मायकल लोबो यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार डिलायला लोबो, मायकल लोबो त्यांचे चिरंजीव तथा पर्रा उपसरपंच डॅनियल लोबो, पर्रा सरपंच चंदानंद हरमलकर यांनी पर्यटनमंत्र्याचे स्वागत केले.
नाताळ हा एक शांती सलोखा राखणारा सण आहे. राज्यातून कोविड दूर होवो व राज्यात सर्वत्र शांती नांदो व देव येसू ख्रीस्त सर्वांना चांगली बुध्दी देवो असे सांगून मंत्री खंवटे यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.









